आरोग्य

दैनंदिन आरोग्यरक्षणासाठी आवश्यक सेवाभावी तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी सुविधा... • अधिक माहिती...

सेवा व सुविधा

विविध सेवाभावे संस्था, क्लब्ज, महिलामंडळे मार्फत भजन, प्रवचन, व्याख्याने... • अधिक माहिती...

इतर उपक्रम

आम्ही अनेक सामाजिक तसेच आरोग्य सेवा शिबीरांची व्यवस्था करतो ... • अधिक माहिती...

समता वृद्धाश्रम

वृद्धत्व म्हणजे जणु दुसरे बालपणच... ते सुखाचे आणि समाधानाचे व्हावे, आयुष्याची संध्याकाळ रमणीय व्हावी या सदहेतूने या संस्थेची स्थापना झाली. वृद्धाश्रम नव्हे वानप्रस्थाश्रम, ही आज काळाची गरज ठरली असून वयोवृद्ध नागरीकांचे उर्वरित जीवन आनंददायक व्हावे या सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून सातार्‍यातील काही धडपड्या समाजसेवी कार्यकर्त्यांनी १७ ऑक्टोबर २०१२ रोजी समता वृद्धाश्रमाची मुहूर्तमेढ रोवली. संस्थेच्या कार्याचा प्रारंभ एका वृद्ध आश्रमवासीच्या निवासाने झाला. प्रारंभी जागाही भाडेकरारावर घेतलेली आहे. परंतू पुढे दानशूर देणगीदारांच्या सहकाऱ्याच्या बळावर यथवकाश टप्याटप्याने आश्रमाची जागा आणि सुखसुविधांची वाढ होईल. संस्था स्वत:च्या मालकीच्या सर्व सुखसुविधायुक्त अशा भव्य आणि देखण्या वास्तुमध्ये दिमाखाने उभी राहिल.
आमचे वृद्धाश्रम १७ ऑक्टोबर २०१२ रोजी सुरु झाले. हे वृद्धाश्रम शहरापासून थोड्याच अंतरावर निसर्गरम्य अशा हवेशीर परिसरामध्ये आहे. एका समर्पित वैद्यकीय माहिती असलेल्या व्यक्तीच्या देखरेखीखाली हे वृद्धाश्रम चालू आहे.

आश्रमातील सोयी व सुविधा

 • शहरापासून थोड्याच अंतरावर निसर्गरम्य हवेशीर परिसर
 • गरजेनुसार लहान-मोठ्या खोल्या आणि फर्निचर
 • आश्रमवासीयांसाठी कॉट्स, गाद्या, उशा, पांघरुणे इत्यादी
 • दररोज दोन वेळा चहा-कॉफी, सकाळी नाश्ता, दोन वेळा सात्विक शाकाहारी जेवण
 • सणावारादिवशी मिष्टान्न भोजन
 • मनोरंजनासाठी वृत्तपत्रे, ग्रंथालय, टेपरेकॉर्डर, टि.व्ही इत्यादी साधने
 • दैनंदिन आरोग्यरक्षणासाठी आवश्यक सेवाभावी तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी सुविधा
 • विविध सेवाभावे संस्था, क्लब्ज, महिलामंडळे मार्फत भजन, प्रवचन, व्याख्याने, संगीतसभा इत्यादीचे सतत आयोजन
 • वर्षातून किमान दोन वेळा प्रेक्षणीय स्थळांच्या सहलींचे आयोजन
 • आंघोळीच्या गरम पाण्यासाठी सोलर सिस्टिम, पिण्याच्या निर्जंतूक शुद्ध पाण्यासाठी अॅक्वागार्ड प्युरिफायर
 • स्वयंपाक, धुणेभांडी, स्वच्छतागृहे आणि परिसर सवच्छता यांसाठी तत्पर कर्मचारी व सेवकवर्ग
 • आश्रमाच्या दैनंदिन कारभारावर निरपेक्षवृत्तीने देखरेख करणारा संचालक वर्ग

बँक अकाउंट माहिती

 • बँक: IDBI Bank,
 • ब्रांच: Godoli Branch
 • ब्रांच(मराठी): Godoli Branch
 • अकाउंट नंबर: 0567102000003605
 • IFSC: IBKL0000567
 • अकाउंटचे नाव: Samata Samajik Mahila Mandal
 • अकाउंटचे नाव(मराठी): समता सामाजिक महिला मंडळ