
वृद्धत्व म्हणजे जणु दुसरे बालपणच...
ते सुखाचे आणि समाधानाचे व्हावे, आयुष्याची संध्याकाळ रमणीय व्हावी या सदहेतूने या संस्थेची स्थापना झाली.
वृद्धाश्रम नव्हे वानप्रस्थाश्रम, ही आज काळाची गरज ठरली असून वयोवृद्ध नागरीकांचे उर्वरित जीवन आनंददायक व्हावे
या सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून सातार्यातील काही धडपड्या समाजसेवी कार्यकर्त्यांनी
१७ ऑक्टोबर २०१२ रोजी समता वृद्धाश्रमाची मुहूर्तमेढ रोवली.
संस्थेच्या कार्याचा प्रारंभ एका वृद्ध आश्रमवासीच्या निवासाने झाला. प्रारंभी जागाही भाडेकरारावर घेतलेली आहे. परंतू पुढे दानशूर देणगीदारांच्या सहकाऱ्याच्या बळावर
यथवकाश टप्याटप्याने आश्रमाची जागा आणि सुखसुविधांची वाढ होईल.
संस्था स्वत:च्या मालकीच्या सर्व सुखसुविधायुक्त अशा भव्य आणि देखण्या वास्तुमध्ये दिमाखाने उभी राहिल.